औरंगाबाद- दंडुका मोर्चाला दंडुक्याची परवानगी नाकारणे म्हणजे सरकारला कळून चूकले आहे की शेतकऱ्यांचा दंडुका सरकारच्या डोक्यात बसल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टिका मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी केली आहे. दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मंगळवारी(ता.२७) मनसेतर्फे दंडुका मोर्चा काढण्यात आला होता.
मोदी आणि फडणवीस सरकार मोठमोठी आश्वासने देऊन
सत्तेत आले. मात्र मागच्या सरकार प्रमाणेच हे सरकारही शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे.
त्यामुळे जरी सरकार बदलले तरी समस्या त्याच आहेत असे शालिनी ठाकरे म्हणाल्या. मनसेच्या
मोर्चात दंडुका घेण्यास परवानगी नाकारणे म्हणजे या सरकारला शेतकऱ्यांची भीती वाटत
असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र सरकारला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नसून ते फक्त
स्वत:चे खिसे भरण्यात व्यस्थ आहेत अशी टीका ठाकरे यांनी केली. पीक विमा योजनेत
सरकारने सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप शालिनी ठाकरे यांनी केला. त्या
म्हणाल्या, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरु असून सरकारने
या योजनेत १५ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याएवजी फडवणीस
सरकार फक्त अभ्यासच करत असल्याचा टोला ही शालिनी ठाकरे यांनी लगावला.
महिलांची सुरक्षितता धोक्यात
सत्तेत येण्यापूर्वी मोदी आणि फडणवीस सरकारने महिलांच्या सुरक्षिततेबद्दल मोठमोठे
दावे केले होते. भाजप सरकारच्या चार साडेचार
वर्षात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. राज्यात ४ वर्षात ३ हजार महीला बेपत्ता
आहेत, त्यांचा अजूनही शोध कसा लागत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.










